देण्याची वृत्ती जया
तेचि सगळे सांता
वेगवेगळी रूपेजरी
येशू अल्ला विधाता…
निरपेक्ष सद् वृत्ती
सद् गुणी हवा दाता
आपणासाठी सांता
आपले माता पिता…
अक्षरे समृध्द करता
शिक्षक बनतो सांता
निरपेक्ष देतो सर्वचं
मित्रावाचून कोणता…
सखा भगिनी भ्राता
बळ देईल जो हाता
दातृत्व जयाचे अंगी
सुखकर्ता दुःख हर्ता…
असू शकतो एखादा
सत्शील निर्मळ नेता
शिव बा भिमरावा सम
श्रीराम नानक त्राता
देणारे ते हात घ्यावे…
भेट वस्तु घेता घेता
दातृत्व चव लागता
बना दाता देता देता…
आपणही करु यत्न
होऊन पाहूया सांता
सुख अवघ्या जगता
पळून जातीलं चिंता…
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.