राखून ठेवी निकाल
लागले तिकडे लक्ष
कायअसे पेटा-यात
विचारात दोन्हीपक्ष
उघडणारं कधी दार
धडधड धडाडे वक्ष
नवस बोलले देवाले
भगवंता रक्ष मा रक्ष
खूप केली रे प्रतिक्षा
लाव बुवा सोक्षमोक्ष
सत्ता राणी खुणावते
रोखलेले तिकडेअक्ष
आणली गुलालपोती
आधीचं सगळे दक्ष
बॅंड सनई ताशेवाले
भरलायं अवघा कक्ष
वाटे सर्वां समोरच्या
होणारं कपाळ मोक्ष
नाचू नका झेंडा घेत
आपल्याचं अपरोक्ष
उडी मारु आता कुठे
टपून बसलेले अपक्ष
सामान्य गुंतले कामा
त्यांचे ना इकडे लक्ष
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.