नि:स्वार्थ पक्षपात न करता बातमी हिच खरी पत्रकारिता !!

0

आज ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ संपूर्ण भारतात लोकशाहीचा विश्वास प्रस्थापित करून बनलेला चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. समाजात होणाऱ्‍या अन्याया विरुद्ध न्याय मिळवून देण्याचं कार्य पत्रकारिता करते. समाजच काय तर देशातील प्रत्येक घटनेच्या मागे या चौथ्या स्तंभाचा महत्वाचा भाग आहे. भारतातील पत्रकारिता कानाकोपऱ्यात पसरावी, त्याची वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकारने 4 जुलै 1966 रोजी ‘प्रेस काउंसिल ऑफ इंडिया’ची स्थापना केली. सर्व कायदेशीर व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यावर 16 नोव्हेंबर 1966 रोजी काऊंसिलचं काम विधिवत सुरू झालं. भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने काम करण्यास सुरुवात केली. म्हणून 16 नोव्हेंबर हा दिवस देशातील जबाबदार आणि मुक्त पत्रकारिता दर्शवतो. 

         

 स्वतंत्र्यापूर्वी पासून पत्रकारितेनं देशात स्वतंत्र्याचा एक लढा पुकारला होता. वेळेनुसार पत्रकारितेमधे बदल होत गेला आणि आजच्या काळात भारतातीत पत्रकारिता एका वेगळ्या शिगेला गेली आहे. पण या सर्वात पत्रकारितेवर अनेक वेळा आरोप देखील करण्यात आले. ज्यामध्ये आधुनिक काळातील पत्रकारिता सर्वगुण संपन्न जरी झाली खरी. पण त्यामध्ये पोकळी देखील मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला दिसून आली. तरी देखील पत्रकारिता मात्र अजूनही थांबली नाही काही अपवाद वगळता आजही त्याच ताकदीने पत्रकारिता राष्ट्रीय स्तरावर होतांना दिसत आहे. ज्या मध्ये देशातील प्रत्येक घटकांचा अभ्यास करत आजची पत्रकारिता एक महत्वाचा पाया रोवतांना दिसत आहे. 

           भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसचे प्रतीक आहे. हाच तो दिवस होता ज्या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नैतिक ‘वॉचडॉग’ म्हणून काम करायला सुरुवात केली होती की या सशक्त माध्यमाकडून प्रेसने केवळ उच्च दर्जाचीच अपेक्षा ठेवली नाही तर ती कोणत्याही बाह्य घटकांच्या प्रभावाने किंवा धमक्यांमुळे अडकली नाही. जरी जगभरात अनेक प्रेस किंवा मीडिया कौन्सिल आहेत, तरीही प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही एक अद्वितीय संस्था आहे. कारण स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या कर्तव्यात राज्याच्या साधनांवरही अधिकार वापरणारी ही एकमेव संस्था आहे. प्रेस कौन्सिलच्या स्थापनेची शिफारस करून पहिल्या प्रेस कमिशनने असा निष्कर्ष काढला होता की पत्रकारितेत व्यावसायिक नैतिकता टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कायदेशीर अधिकार असलेली संस्था अस्तित्वात आणणे, मुख्यतः उद्योगाशी संबंधित लोक ज्यांचे कर्तव्य मध्यस्थी करणे असेल. यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि स्थापनेपासून विकसित झालेल्या संस्थेने हे उद्दिष्ट नाकारले नाही. काऊन्सिल ऑफ इंडिया विश्वासार्हता राखण्यासाठी सर्व पत्रकारितेच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवते. देशातील सुदृढ लोकशाही राखण्यासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाची महत्त्वाची भूमिका आहे. हे भारतातील प्रेसवर कोणत्याही बाह्य बाबींचा प्रभाव पडणार नाही याचीही खात्री करते. 

         

प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था आहे, ज्याला प्रिंट मीडियाच्या ऑपरेशनवर देखरेख ठेवण्याचा अधिकार आहे. प्रेस काऊन्सिल अ‍ॅक्ट 1978 द्वारे जनादेशाद्वारे हे अधिकार मिळाले आहेत. याअंतर्गत एक स्पीकर आणि इतर 28 सदस्य असतात, ज्यापैकी 20 प्रेसचे प्रतिनिधीत्व करतात. पाच संसदेच्या दोन सभागृहांद्वारे नामनिर्देशित केले जातात आणि तीनजण संसदेत प्रतिनिधित्व करतात. सांस्कृतिक, साहित्यिक आणि कायदा विषयातून हे निवडले जातात. ही एक वैधानिक, अर्ध-न्यायिक संस्था आहे, जी देखरेखीच्या रुपात काम करते. यामाध्यमातून नैतिकतेचे उल्लंघन आणि पत्रकारिता स्वातंत्र्य उल्लंघनाच्या तक्रारींचे निराकरण केले जाते. सर्वप्रथम हिकीचे ‘बेंगॉल गॅझेट’ हे साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र कोलकात्यात 1780 साली सुरू झाले. त्यांनीच भारतात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. मराठीत बाळशास्त्री जांभेकर यांनी 21 जून 1832 मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले जे 1840 पर्यंत चालले. याच काळात हिंदी व अन्य भारतीय भाषांमध्ये अनेक वृत्तपत्रे सुरू झाली.

 

वृत्तपत्राची संकल्पना त्याकाळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1956 मध्ये प्रेस कौन्सिलच्या स्थापनेची शिफारस करून पहिल्या प्रेस कमिशनने असा निष्कर्ष काढला होता की पत्रकारितेत व्यावसायिक नैतिकता टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कायदेशीर अधिकार असलेली संस्था अस्तित्वात आणणे, मुख्यतः उद्योगाशी संबंधित लोक ज्यांचे कर्तव्य मध्यस्थी करणे असेल. जे लोक त्याची कदर करतात, त्या सर्वांनी हा दिवस साजरा करावा. आज राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्त प्रसार माध्यमातील सर्व पत्रकार बंधु-भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा !

प्रविण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here