पंचवीस  …/नव वर्षा ..

0

सालचोवीस सरले

चांगली नोंद वहीत

साल नवे  पंचवीस 

नव्या उमेदी सहीत…

स्वागत नव्यावर्षाचे

का करू भीत भीत

उत्साह उत्सव पाहे 

जगत होई  स्तंभित …

शुध्दभारतीय आहो

कळे परंपरा न् रीत

समस्त सही  करतो

घडले जरी विपरीत …

नव वर्षाचे पोतडीत

असो दडलेले गुपीत

बदलणारं भाग्यरेषा

प्रयास करे समर्पित… 

ट्वेन्टीफोरआनंदात

झालो केवढे मोहीत

नवीन अध्याय कसा

काहीचनाही माहीत…

अर्थव्यवस्थानाजूक 

ना धोरणडळमळीत

भले  चांगले प्रकल्प

संकल्प नअडगळीत …

आतिथ्य सस्नेह करा

शंकाकुशंका विरहीत 

नवीनवर्ष हो सुखस्थ

स्वताचं हो सम्मोहित …

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996

 www.kavyakusum.com

नव वर्षा ..

पक्ष्याने सहज यावे 

नीतळ  हवे सरोवर 

नव वर्षं सुखी व्हावे

सजवू अशी धरोवर…

गुलाबी  सरती  रात्र 

आठवण ही मनोहर

उष:कालआशादायी

हवा तितकाचं सुंदर …

स्वागत नव वसंताचे

सजवून ठेवले मखर

दूर ठेवा कडवटपणा

स्वभावा हवी साखर…

नको डि जे  धिंगाणा 

कोकिळा गाई सुस्वर 

वेदना  सरल्या  रात्री

आला उदया भास्कर …

कसे रहावे वर्षाने या

नसेल हाती खरोखर 

कर्म  करावे  आपण

हे ही तितके  बरोबर… 

बदलत जाई तारखा

काहीच नाही स्थावर

लक्षात  राहीलं  नाव

असाचं  असो  वावर…

पिवळीपाने समर्पीत

नवपालवीआल्यावर

नवरी  दिसते धरोवर

रे हिरवत्व ल्याल्यावर…

 – हेमंत मुसरीफ पुणे 

   9730306996.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here