मंत्री पद मिळणारं
सर्वां होती अपेक्षा
इच्छा अनुयायांची
जास्ती माझ्यापेक्षा…
शक्ती प्रदर्शन केले
वाढल्या खूप कक्षा
नाव कसे वगळले
बदलून टाकी नक्षा…
कळले नाही कशी
दिली असली शिक्षा
अव्वल येतो बोलता
नापास होई परिक्षा….
झोळ्या माझ्याकडे
तिसरे वाटती भिक्षा
प्रिय असूनि शिष्य
दुस-यांना देई दिक्षा…
घेऊन मोठी अपेक्षा
सोडूनि आलो पक्षा
तुटून पडता कुंपण
कोण करणार रक्षा…
आता वाटते उगाचं
बंद पाडली रे रिक्षा
परतीचे दोर कापले
सगळीकडेचं उपेक्षा…
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
तत्पर ..
प्रतिपक्षांत पडेफूट
प्रयास करा सत्वर
येवू द्या बंडखोरांना
स्वागता सारे तत्पर..
पायघड्या ये गड्या
फुलांनी भरले डंपर
घे तिकीट डायरेक्ट
ऑफरझकास बंपर…
दार उघडूनि तय्यार
गाडी घेऊनि शोफर
मान सन्मान भरपूर
भले असू द्या लोफर…
सुसंधी ठोठावते दार
करून घ्यावा वापर
माल मसाला भरता
पिक्चरहीट हो सुपर…
गुलाल उधळा रस्त्या
भरभरुन आले टिपर
नाराजीनामा प्रसिध्द
राजीनाम्याचा दे पेपर…
आपल्यापक्षां येणारां
देणारं फाडून छप्पर
बाहेर जाणारा तेवढा
रे असतो गद्दारढप्पर…
– हेमंत मुसरीफ, पुणे
9730306996
www.kavyakusum.com