पाच सप्टेंबर ../शिक्षकी पेशा

0

पाच सप्टेंबर ..

पाचसप्टेंबर दिस तो

सदैव मला  डिवचतो 

आहे बाबा तू शिक्षक

मलाच तो  शिकवतो

मुकाफोनही  बोलतो

सकाळपासूनवाजतो 

शुभेच्छांचा वर्षाव तो  

चोहीदिशांनी गाजतो

विद्यार्थ्यांचा ताफा तो

घरातओसंडून वाहतो

किती प्रिय  असे गुरू

विस्फार जोतो पाहतो

फोटोसाठी पोज देता

मी खूप  खूप  थकतो

हार तुरे  खच मोठाला

स्नेह भाराने रे वाकतो

इव्हेंट झाला सु संपन्न

छात्र वर्ग  परत जातो

सोशल मीडिया वरती

दिसाचे गुणगान गातो

दिवसजाता अस्ताला

मी  ही मावळून जातो

एक दिसाचा सुलतान

पुरा  कोसळून  पडतो

२)

शिक्षकी पेशा

गिरवितो  श्री गणेशा

शिक्षक बनुनि  माता

वळण लावी जीवना

शारदास्पर्श हो हाता

करडी शिस्त लावता

नकळत बनतो पिता

छत्र  दे आशीर्वादाचे

सांभाळी होवूनभ्राता

कसोटीत्याचीच लागे

परिक्षा आमची  घेता

त्याचाचं सबळ  हात

निराशा पदरात  येता

कुठलीचं नसेअपेक्षा

सखा भासे आवडता

देत  राहतो  सदोदीत 

हात न  घे आखडता

नागरिक बने सुजाण

आदर्श समस्त जगता

शिक्षकाची उपकृतता

माणूस म्हणून जगता

देवा सारखा  बरोबर 

संकटात  तोच  त्राता

विविध  रूपात  दिसे

सगुण  निर्गुण  देवता

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here