हंडाभर पाण्यासाठी
गावभर फिरते बाई
फिरे सारे दिशादाही
दादा अन् बाबाआई….
वाट पाहे तासन्तास
कधीतरी टॅंकर येई
हाणामारी बाचाबाचं
सगळ्यांची उडे घाई…
शेजारच्या बंगल्यात
कारंजे नाचे थुई थुई
कुलरमधे पाणीगच्च
फुलली बागा वनराई…
पाईपलाईनी फुटल्या
भोके पडले ठाई ठाई
कसेकोण पहात नाई
पाणीफुके वाया जाई….
महागड्या त्या गाड्या
रोज रोज धुवता बाई
तहानेने व्याकुळल्या
बैल बकरी म्हैस गाई….
पाणी त्यांना मुबलक
आमच्या साठी टंचाई
कुठून येते पाणी तया
विचार ना कधी आई….
-हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996…
२
महादशा ..

हंडाभर पाण्यासाठी
फिरतोयं दाही दिशा
ओरड करावी कशी
कोरड लागली घशा…
टॅंकरवाला माजलेला
ऐकावी उर्मट भाषा
लटपट करतात पाय
वाटे तुम्हां केली नशा…
महागड्यागाड्या त्या
दररोज धुवता कशा
कारंजी नाचे थुईथुई
एसीमध्ये पिके हशा…
वाॅटरपार्क मस्त चाले
वाजतात ढोल ताशा
पाणी कुठून आणता
प्रश्नांकीत तशाचं रेषा…
थेंबभर पाणी द्या हो
इतकीचं रे अभिलाषा
विचारणार मुळीनाही
संपेलं कधी महादशा…
महापूर ती अतिवृष्टी
करे त्राहीत्राही भाषा
कशी ही पाणीटंचाई
कशी भागवावी तृषा…
-हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996…