फेक नॅरेटिव्ह …/बेस्ट ईलाज …

0

वरून  सक्त आदेश 

फेक नॅरेटिव्ह  बनवा

शोधा म्हणजे  मिळे

विषयां नाही वानवा

इच्छा पूर्तता  संपूर्ण 

अल्लाउद्दीनचादिवा

झट पट  सुधारे सारे

लाभे  रामबाण दवा

प्रसिध्दी झोतांसाठी

शोध लागलायं नवा

रे नॅरेटिव्हचा भडका

तळा गळाशी न्यावा

पाहतापाहता पहावे

बदलून जाईलं  हवा

कायखरे काय खोटे

विचार कशाला हवा

कोंडीत पकडा पक्षां

नवीन गनिमी कावा

बहाद्दूरही नामोहरम 

बळी पडतीलं  डावा

सशक्त पक्ष  हादरेलं

मारे जोशात लखवा

चितपटहोई पैलवान 

सिधे अस्मानदाखवा

बेस्ट ईलाज ..

साध्या सर्दी  पडशा

डाॅक्टर  हवेत  बेस्ट 

उच्चतम  हाॅस्पीटल 

सुविधा हव्यात जेष्ठ 

ए सी सुपर डिलक्स 

खाजगी रुम उत्कृष्ट 

चव नसू द्या जीभेला

जेवण  देता स्वादिष्ट 

अद्ययावत उपकरणे 

सहज करती आकृष्ट 

बाहेरच्या रंगा भुलले

तिथेचं सगळे  संतुष्ट 

एका मागून असंख्य 

सुरु होतात त्या टेस्ट

जखम होते बोटाला

तपासणी  करी चेस्ट

क्लिनिकल एक्झाम

रोग्याला मिळेना रेस्ट

मालक बनली व्याधी 

आली बनून जी गेस्ट 

आजारी राही तसाचं

आजार होतो धष्टपुष्ट 

विमासुरक्षा‌ कवच ते

मेडीक्लेम दे धारिष्ट्य 

– हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here