बजेट  ..

0

तोचि खेळ  पहावा

जुन्या   तिकीटावर 

ठरलेल्या प्रतिक्रिया 

बजेट आल्या नंतर…

सत्ताधारी आनंदात 

नाही काही गत्यंतर 

बजेट हे आशावादी 

रे होणार  स्थित्यंतर…

विरोधक ओरडतात 

भुमिका तीचं निरंतर  

चर्चा त्याचं वांझोट्या 

चालत  राहती  नंतर..

कुणीम्हणे सापडला

प्रगती गतीचा  मंतर

बजेट  निमित्त  मिळे

खरा खुरा  बा  मैतर…

कुणी  बोले वाढणारं

गरीबी श्रीमंती अंतर

वरुन बाळ ते गोंडस

माहिती नाही  भितर…

पाहू या कसे  होईल

पुढे मागे  खरे चित्तर

नव्या  कुपीत घातले

जुने पुराणे ते  अत्तर…

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996..

 www.kavyakusum.com

2

विकास ..

लोभसवाणा  शब्द 

सबका हो विकास 

ऐकायां  अति गोड

वाटे  भारी झकास

दिपवून  टाक डोळे

लखलखाट प्रभास

आवडते स्वप्न रंजन

सत्यांहून प्रिय भास

कठीण जरी असले

जिंका पूर्ण  विश्वास

गुलाम बनो स्वेच्छेने 

विचारुन  घेती श्वास

पंगतीत पाळा पथ्य

स्वादिष्ट आरंभघास

चटक लावा नशिली

आपला लागे ध्यास

सवय आपली लावा

प्रारंभीपडते सायास

गातीलं भजनमाधुर्ये

सत्यातयेतीलकयास

वर्णनअसले करायचे

हारां सम भासे फास

बंदिस्तसाखळी छान 

भलावाटे विजनवास 

–  हेमंत मुसरीफ पुणे. 

   9730306996.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here