बजेट …

0

तयार करणे बजेट

तारे वरची कसरत

बजेट हे सर्वांसाठी

जाते कसे विसरत

एका हाताने देतात

दुस-या हाती परत

भोकं पडला  घडा

कधी नसतो  भरत

आश्वासने  कागदी

घोडे नाहीत धावत

आभासी पैसे सारे

खिशात ना  मावत

श्रध्दा नाही  ज्याले

नवसा नाही पावतं

प्रसादाच्या पंगतीत

बसलो कसे  जेवत

विरोधकांची  कामे

रहा कायम  भिडत

चर्चा चाले बजेटची

एकमेकांवर चिडत

असेवारे काही असे

ठेवी  फक्त झुलवत

झोळीअंती रिकामी

आलो हात  हलवत

असते जया  दानत

त्यानेचंद्यावी दावत

लाडकी राणी खुश

नाराज नीत  सवत

सगळे होतीलं तृप्त

अपेक्षा नाही  करत

एवढे करावे निदान

बदला  थोडी  मुरत

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

2

क्लेम ..

मेडिक्लेमपाॅलिसीचे

वाढले चांगले  प्रस्थ

एक  बाजू  भक्कम 

रूग्ण झालेत स्वस्थ

नवे विचीत्र  विषाणूं

करती नीत अस्वस्थ

नवीन तंत्रज्ञान आले

करी सकल आश्वस्त

ईलाज तेवढेचं  रोग

विविधव्याधीने ग्रस्त

विमा संरक्षण घेऊन

आपणच घाल  गस्त

फसवा  फसवी वाढे

कंपनी  निवडा रास्त

क्लेम  आहे  म्हणता

बीलही फुगते जास्त 

जागरुक रहावे सदैव

भरावीवेळेवर किस्त

उघडी ठेऊनि  बुध्दी

कार्या असावी शिस्त

नियमांच्याजंजाळात

सामान्य जनता त्रस्त

क्लेम  होता नामंजूर

बजेट होईलं उध्वस्त 

क्लेम पास करताना 

का यंत्रणा बने सुस्त

आश्वासने अन्पूर्तता 

प्रमाण कायम व्यस्त

हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here