बाळासाहेब नावात शक्ती भक्ती दाटली/ …बाळासाहेब  नावाने….

0

बाळासाहेब नावात

शक्ती भक्ती दाटली

दिवस सरे भराभरा

माया  नाही आटली

सहज करता सामना

भय भिती न वाटली

पत्रकारिते  नवोन्मेष

अद्भुत उर्जा साठली

व्यंग नाही  मनामध्ये

रे व्यंगचित्रे रेखाटली

मार्मिक कुंचला फिरे

भल्याभल्या फाटली

मराठी माणसां  ऊरां

जागृत मशाल पेटली

हात घाले काळजाले

ओळख स्वता पटली

हाक त्यांनी एकदेता

सर्वजनता झपाटली

हिंदू हृदयसम्राट खरे

नवीन हवा सुसाटली 

नावांवर  कित्येकांनी

सत्ता  स्थाने  लाटली

प्रतिमा लावून  मोठ्ठी

दुकाने  पहा  थाटली

भरला बाजार पाहून

मने  खरोखर विटली

खरे पाईक होवू तया

ठरावी  दिशा कुठली

 

 

नाव बाळासाहेब..

बाळासाहेब  नावाने

उंचीअत्युच्च गाठली

जयकार कर जाणवे

अद्भुत उर्जा साठली

व्याघ्र  गर्जना ऐकता

भल्याची रे  गारठली

होई सभा भिडे नभा 

हवाक्षणात पालटली

आवाज खणखणीत

हौसकानाची फिटली

बोटे  ठेवता वर्मावरी

कित्येकांची  फाटली

सामनापत्र वाचताना

मशाल धडाडा पेटली

मराठी अस्मिता पुन्हा

मराठीमाणसा भेटली

मार्मिक कुंचला  फिरे

व्यंगचित्रे छान नटली

हात घाले काळजाले

पतंग कित्येक कटली

हिंदू  हृदय  सम्राटांची

स्मृती मनोमन दाटली

मराठी अस्मिता जाण

महती  अगाध  पटली

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here