आनंद वाटतो मला
असे अनेक बहिणी
सख्या चुलत मावस
मानलेल्या ही कुणी
भाऊबीज सणाला
घेत राही ओवाळुनि
मन जाय उचंबळुनि
सुख ना मावे गगनी
मिठाई खावी किती
जागा ना उरे वदनी
घराला येईल घरपण
भगिनी येतात सदनी
माता पत्नी सोडूनि
बाकी सा-या भगिनी
आशीर्वाद देता घेता
येते किती गदगदुनि
जबाबदारीही तेवढी
मना सांगे बजावूनि
ओवाळी सर्वभगिनी
मजवरती विश्वासूनि
भाऊबीज हवी रोज
भाग्योदय उजळूनि
महिला अत्याचार ते
जाती सहज जळूनि
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
बहीण .
एक पत्नी व्रत राम
पतिव्रता अर्धांगिनी
सितामाता अनुरूप
भाग्यवती भामिनी
बाकीच्या महिलांना
मानावे माताभगिनी
साक्षात रे शक्तीपीठ
जणू चौसष्ट योगिनी
दुःशासन होणे सोपे
दुर्योधन वसतो मनी
रक्षावे रे पांचालीला
कन्हैया सखा बनुनि
छेडछाड करणे सोपे
पहावे कधी रे रक्षुनि
नको विखारी नजर
पहा सौहार्द चक्षुनि
भाऊबीज रक्षाबंधन
आनंद दिगंतर गगनी
सत्कर्म करिता सदैव
सार्थक होईल जगुनि
मिठाई खावी किती
जागा न उरे वदनी
हव्या भहिणी अजुनि
सांगतो देवास वंदुनि
— हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६