पांडवा संगे द्रौपदी
सुखात राहते वनात
कृष्ण भाऊ लाडका…
धावा करिते मनात
कन्हैया येई भेटीला
भुक लागली जोरात..
अन्नाचा कणही पण
उरला नव्हता घरात
खिन्नझाली पांचाली
खंड पडला मानात….
तुळशीचे पान एक
राहिले होते पानात
पान खातो कन्हैया
तृप्तता होते पोटात…
स्नेहाची दुथडी वाहे
आशीष येई ओठात
भावा बहीणीचे नाते
अद्वितीय हो जगात…
अनोखे हे भावबंधन
प्रसिद्ध युगा युगात
— हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६