आंबेगाव: पंचशिल उत्कृष्ट मंडळ (रजि.) घडेगांव या संस्थेतर्फे देण्यात येणारा भिमरत्न पुरस्कार – 2023 मंचरचे साहित्यिक मोहम्मदशकील जाफरी यांना डॉ. प्रकाश जी वाघमारे (मा. पोलिस उपायुक्त) यांच्या प्रमुख उस्थितीत मा. कैलासबुवा काळे (मा. सभापती पंचायात समिती, आंबेगाव) यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.
गेल्या 35 वर्षपासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण धर्म निरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या सारख्या आणेक विषयांवर जनजागृती कार्य करणीरे मो. शकील जाफरी हे सामाजिक कार्यकर्ता, जादूगार, बहुभाषिक कवी, मुक्त पत्रकार, व्याख्याता, लेखक आणि नाणे, नोटा व टपाल तिकिटांचे संग्राहक म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष महेश ज्ञानेश्वर वाघमारे, राहुल वाघमारे, गणेश वाघमारे, अरुण वाघमारे, शाम वाघमारे, आशिष वाघमारे, मुकेश वाघमारे, बाळासाहेब वाघमारे यांच्या समवेत पंचशिल उत्कृष्ट मंडळाच्या पदाधकारी व कार्यकर्त्यांसमवेत स्वराज मंडळ, संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळ, राजमुद्रा ग्रूप, संत सावतामाळी नवरात्रोत्सव मंडळ, विश्वकर्मा मित्र मंडळ, क्रांती मित्र मंडळ, जय हरी मित्र मंडळ आणि सन्मित्र मित्र मंडळाचे पदधिकारी वा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.