मराठी राज्य भाषा दिनानिमित्त विमला तलाव येथे रंगले कवी संमेलन.

0

उरण दि 28 (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्य भाषा  दिन व कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा व मराठी भाषेविषयी प्रेम आपुलकी निर्माण व्हावी, मराठी भाषेविषयी जनजागृती व्हावी या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 27 फेब्रुवारी 2023 रोजी उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे संध्याकाळी 6 वाजता मराठी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कवी संमेलन प्रसंगी कवी सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, मारुती तांबे, एल बी पाटील , भ. पो म्हात्रे,राम म्हात्रे, अजय शिवकर, संजय होळकर, संग्राम तोगरे,मनोज ठाकूर, जयवंत पाटील, दौलत पाटील, केसारीनाथ ठाकूर, रामचंद्र म्हात्रे आदि कवीनी मराठी भाषेत कवीता, गाणे, चारोळी, गझल गाउन मराठी भाषेचा इतिहास, भाषेचा महत्व प्रतिपादित केले. प्रत्येक कवींनी अंतिशय सुंदर आवाजात कविता गाऊन रसिक प्रेषकांची मने जिंकली. यावेळी प्रत्येक कवी व ज्येष्ठ नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात  विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या अँड गोपाळ  शेळके, संजय होळकर, केसरीनाथ ठाकूर,संग्राम तोगरे, दिनानाथ कोळगावकर या मान्यवरांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन संजय होळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, सदस्य सादिक शेख, आकाश पवार, ओमकार म्हात्रे, अक्षय कांबले , निकिता पाटील,सानिका पाटील,तेजस सनस आदींनी विशेष मेहनत घेतली. एकंदरीत कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here