महागौरी शुभ्र वर्णी
श्वेत वृषे समारूढा
अक्ष दिपले पाहता
चतुर्भुजा सिंहरुढा…
अष्ट वर्षी कुमारिका
कठीण तप पहाडा
वज्र ही मऊ होईलं
मेघ बरसला धडाडा…
कळली कुठे लिला
शक्ती तव महामुढा
संसारी रहाट गाडा
चक्राफसे महागुढा
शुभनिशुंभ दैत्याशी
देई आई सार्थ लढा
मनातल्या षड्रिपुंचा
भरलासे पाप घडा
दंभपणा काढेफणा
वाजे अहम् चौघडा
असुरी वृत्ती कडेचं
सदैव आमचाओढा
त्राहीत्राही माते मम
सोसेना राम रगाडा
सोडवी सहज जरा
आयुष्याचा तिघाडा
– हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६.