माप ..

0

तराजू धरावा असा

कमी भरणारं  माप

फायदा हवा आपला

मापात होऊदे  पाप..

गोडवा हवा बोलता

गि-हाईकावरी छाप

सर्वत्र पसरले  लोण

वाढत चालला व्याप..

फसवता  म्हणायची

नकोयं कुणाची टाप

भुलावे वरलीया रंगा

वातावरण  टिप टाॅप …

अटकाव  करी कुणी

लगेचं उसळी संताप

तक्रार  करणा-याला

सहन करा  मनस्ताप ..

सुटूनजातातआरोपी 

बळी जाती  निष्पाप

कडकअसावी शिक्षा

पुरे  व्हावे  उपद्व्याप …

अक्षम्य अशाचं चुका

देव ना करणारं माफ

आपणचं न्यायदेवता

कसा मिळेलं इन्साफ..

– हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६.

 www.kavyakusum.com

नावे ..

नवीन प्रकल्पाला

कुठली द्यावे नावे

सुरु होतात वेगाने

उगाचचं  हेवे दावे

कर्मयोग कार्यक्षम 

कामकरे मनोभावे 

काही विचार करी

कितीहाताने खावे

वाटाघाटी भांडणे

कुणांस कसे द्यावे

का करे अडवणूक 

ज्यांचे त्यांना ठावे

एक कलमी काम

दिसेतिथे अडवावे

भली भली माणसे

उगाचचं  सडवावे

काम असून उजवे

विचार  उगा  डावे

अतर्क्य असे फार 

त्यांचे गनिम कावे

लोक घेतील नावे

काम असे असावे

उलटा करी विचार

पुसली जाती नावे

हेमंत मुसरीफ पुणे. 

   9730306996

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here