मुर्ती कार .

0

मंगलमूर्ती सुरेखमूर्ती

मुर्तीकार घडवितात

कला आविष्कार  ते

मुर्तीमध्ये जडवितात

मुर्ती कार  कलाकार

नाही त्यांना धर्मजात

कुणी शिकतो कष्टाने

कलाप्राप्त जन्मजात

मुर्तीमध्ये जीवत्व येई

जागृती  होई अंतरात

कार्यरत असंख्य हात

साजरी छान नव रात

हिंदुदेवता आहे कशी

मुसलमान  जाणतात

धर्म  जात ना आडवी

जागृती ती आणतात

विहंगम दृश्य  असले

दिसते  सर्व उत्सवात

मुर्तीकार  असो कुणी

कमी  नाही उत्साहात

निमित्ते वाढे  रोजगार

सुखाचेघास मिळतात

गणेश कृपा सर्वतोपरी 

कैक  संसार जुळतात 

हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996

 www.kavyakusum.com

2

भाद्रपद ..

मुश्कीलीने पाळला

संपला बुवा श्रावण

चला रे काढा आता

वाफेवरील  झाकण

वाळलेल्या घशामधे

ढकलले बुवा द्रावण

पुरे झाले भात वरण

वाढा  सामीष जेवण

सुरू  झाला भाद्रपद 

नको केळी शिकरण

वर्ष भर  मुक्त आता

बदले सारे व्याकरण 

डोकावून पाहे  कसा

मनात  लपला रावण

जीवावर येवूनि  उगा

नका रे  पाळू श्रावण

गणेशोत्सव रे दारात

आले नव्याने स्फुरण

नको  गोंधळ उन्माद

रहावे  कायम स्मरण

हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996

 www.kayakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here