मुशाफिरी …

0

नवीन मार्ग चांगला

पक्ष  पर्यटन करावे

पक्ष आहेत  भरपुर 

मनसोक्त रे फिरावे…

राजकीय भवितव्य 

उज्वल जिथे ठरावे

आवडते वातावरण 

तिथे  छान स्थिरावे…

विचीत्र पक्षांचे झेंडे

उंच  उंचावून धरावे

कुठला पक्ष सोईचा

तपास आधी पुरावे…

समोरच्या पक्षानेही

आपणास्तव झुरावे

दिवाणखान्यामधून 

माजघरामधे शिरावे…

इतके पक्ष  बदलावे

पाहणारेही चकरावे

आज कोणत्यापक्षा

स्वतालाचं विचारावे…

दिसेल त्या  शिवारा

मोकळेपणाने चरावे

मनमौजी मुशाफिरी 

ब्रीद वाक्य आचरावे…

– हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

2

योजना लाडकी ..

लाडकी  बहीण छान 

योजना आणली नवी

अंमल बजावणी मात्र

काळजी पूर्वक व्हावी..

लाभ  मिळे लाभार्थ्यां

अपेक्षा ना अ वाजवी

पंख लावलेले स्वप्नांचे

जाहिरातबाज सजवी…

फायदा कुणा कुणाला 

तळागाळातही रूजवी

श्रेया साठी  वाद नको

आपलाढोलक वाजवी…

अटी नियम जंजाळात

संभ्रम कशाला माजवी

प्रत्येक योजनेला बाजू

असणारचं डावी उजवी…

आम्हां का सुचले नाही 

डोके कराकर खाजवी

काळजीमहिलावर्गाची

डंके की चोटपे गाजवी…

कृत्ये  विचीत्र कुणाची

सकलयंत्रणेस लाजवी

एजंटाचा रे सुळसुळाट 

सर्व  भोके नीट भुजवी…

हेमंत मुसरीफ पुणे 

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here