रतन टाटा ..

0

निधनआपले दुःखद 

उद्योग जगता प्रलय

टाटा  करतात  टाटा

पिळवटून गेले हृदय

टायटन घड्याळ देई

मनगटीबांधले समय

नमक शुध्द न् चविष्ट 

भोजना  चवीची लय

जग्वार श्रीमंतां साठी 

नॅनो साधते अंत्योदय

सकाळी चहा पिताना

आपली सदोदित सय

विश्वासार्हउत्पादनांची

सकला लागली सवय

आबालवृद्ध सर्वांनाच 

टाटांचे नामांकन हवय

वाजवी दरात बिजली

दर्जात नाही रे हयगय

सल्लामसलत संस्थाने

रोजगारास्तवअभ्युदय 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्री

अमृतमयी रे जलाशय

दूर संपर्क  उद्योगांतूनि

जवळ जगत अतिशय

बांधकाम सुद्रुढ सक्षम

गुणवत्ता  प्रदत्त अभय

आपल्या वाहनां मधून 

प्रवास सुखाचा निर्भय

– हेमंत  मुसरीफ, पुणे

  9730306996.

 www.kavyakusum.com

सिमोलंघन ..

महिषासुरमर्दिनी तव

भक्तीभावाने औक्षण

नवरात्र उच्चतम बिंदू

विजयादशमीचा सण

कुप्रवृत्तीवरतीविजय

रामाने वधिला रावण

अंतिम राम उच्चारण

सद्वृत्तीला जा शरण

मुहूर्तांपैकी साडे तीन

अलौकिक असे क्षण

जगायचे  सुरेख छान 

मानव सार्थ विचक्षण

पांडव वनवास सरला

विजयोत्सवांचे तोरण

स्मरा महाभारत कथा

असो  सुधर्माचे धोरण

हिशेब वह्यांचे  पूजन

करेश्रध्दे व्यापारीगण

शस्त्राअस्त्रा पुजताना

श्रमा घामाचे समर्पण 

पत्नीपति चाले संगती

नाती  बंधने विलक्षण

सुखे संसाराची गुंफण

कुटूंब करती सुलक्षण

करता  पूर्व  नियोजन

करावे कृत्याचे प्रेक्षण

बळी राज्य  सुखे यावे

कृतज्ञता वर्षा  प्रोक्षण

– हेमंत मुसरीफ पुणे.

   ९७३०३०६९९६ 

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here