सिंधखेडराजा स्थळी
सहज कधीही जाता
थरार जाणवे आजही
जनली इथे राजमाता …
स्वराज्य निर्मीले जया
शिवबा राजा जाणता
घडविला असा सुपुत्र
रे धन्य जिजाऊमाता…
इथल्या पवित्र मातीत
जाणवे ओली ममता
इथल्या दगड धोंड्यां
कळली रे कणखरता….
भुईकोट तो राजवाडा
सांगतो आऊची कथा
रंग महाल उत्साहात
उलघडे आईची गाथा…
मोती तलाव पाझरतो
वात्सल्य रूपी सरिता
जिजाऊ सृष्टी सांगेलं
कशी होती राष्ट्रमाता….
भव्य दिव्य तो पुतळा
भासतो जणूं बोलता
अभिमानाने ताठ मान
झुकते अलगद माथा….
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.