रिल्स …/शारंगधर ..

0

आता नवी ओळख

सेलधारी होई पिढी

उघडली  बाजारात 

ही दागिन्याची पेढी…

रील बनवा झकास

प्रत्येकां  लागे गोडी

सतत सगळे  गुंतले

उसंत कुणास थोडी…

वयाचे  सुटले बंधन

सवय झाली रे  वेडी

रिल  घाले धुमाकूळ 

शहर असो वा खेडी…

येता रिल्स कुठलेही

धडा धडा पडे धाडी 

का सारे पागल झाले

कशी अशी करे खोडी…

प्रसिद्धी मागे सगळे

फटाफटा मारा उडी

उंची वरती चढायला

लावलेली असे शिडी…

वास्तावा पासून लांब

माणसे  बनली मुडी

शांततेच्या आयुष्यात

कशी विचीत्र झगडी…

हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996

 www.kavyakusum.com

2

शारंगधर ..

भल्या  उपक्रमाचा

कुणा नसतो आदर

चुकलेल्या  पाडसा

कुणी नसतो फादर

स्तुतीकरता कंजुस 

टिकास्त्रसोडे अधर 

विस्कोट परिस्थिती

माजवे सतत धर्धर

प्रत्येकजण आपले 

तुडुंब भरतात उदर

चॅनेलकट्टाभरलेला

चालवा मस्त  सदर

नजाणे पापकुणाचे

अफवा राहे गरोधर

मुर्खबाजारी पोचते

शहाणपण अगोदर

बिघडून जाते शांती

कुणाला नाही कदर

लाज काढे निर्लज्ज 

कितीही झाके पदर

पापे भरलेली शंभर 

पहा देवा रे गिरीधर

मातला रे  मेघनकर

वध करेलं शारंगधर 

– हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here