अपयशांचे खापर
एखादा नेता लक्ष्य
नसल्याचुका काढे
वेधूनि घेतात लक्ष…
चूका नसता काही
होतो फुकाचा भक्ष
खत पाणी घालाया
विरोधी सगळे दक्ष..
टळे पिडा आपसूक
करती मुद्दाम दुर्लक्ष
बुडू देती बुडत्याला
कोणघेणारं हो पक्ष…
उपट सुंभ उपटतात
द्यायला खोटी साक्ष
आपलेवर बालंट न
भरुन वाहतात कक्ष….
उगाकरून तडजोड
नको रे कपाळमोक्ष
उत्सुक झाले बाकी
लावायला सोक्षमोक्ष…
मास्टर स्ट्रोक मारता
हादरे मुळातूनि पक्ष
प्रति पक्षात असणारे
घेऊलागे आपला पक्ष…
अभिमन्यू होई जागा
चक्रव्यूह दिसे समक्ष
कौरवा सह पाडवही
चमत्कार पाहे विलक्ष…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६..
2
परिवारात ..
परिवार वाद विवाद
गाजू लागले तिकडे
का होती अत्यवस्थ
सामान्य जन इकडे
खुशाल भांडतात ते
निगरगट्ट का कातडे
पाहवेना ती ताटातूट
तुटे आमचेचं आतडे
एक संघ कुटुंब राहो
आम्ही घाले साकडे
सत्तेसाठी हपापलेले
थोबाड त्यांचे वाकडे
जुने छान नातेसंबंध
फटाफटा पडे तुकडे
व्हायलानको असे रे
आम्ही विव्हळेदुखडे
सगे सोयरे विरोधांत
दिमाखात राही खडे
कुणाच्या बाजू जावे
संभ्रमात आम्ही वेडे
एकमेकांच्या विरोधां
बिनधास्त कसेझगडे
विवंचना आमचे मनी
धरावे कुणाचे तागडे
राहे सत्ता परिवारांत
बा भले काहीही घडे
आमच्या पदरा शून्य
आम्ही राहणारं उघडे
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६