उपभोगशून्य स्वामी
भरलेला जनदरबार
दिशादर्शी राजकर्ता
शाहू सम्राट आभार
अंतर्मुख चिंतनशील
पुरोगामी नव विचार
सत्यशोधक तत्वांचा
तळगाळा करे प्रचार
बहुजना गरीबासाठी
सशक्त सदैव आधार
राज्याची लोकशाही
मिळे सार्थ जनाधार
सकलवर्गास शिक्षण
योजना करी अपार
ज्ञान सरिता दारात
संपे सनातनव्यापार
विधवापरित्यक्त्यांना
पुनर्विवाहां अधिकार
विकृत रुढीपरंपराचा
सदैव केला धिक्कार
सिंचन जल योजना
हरीत शक्ती पुरस्कार
बळीराजा सुखावला
घडे अनेक चमत्कार
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
2
शाहु राजा ..
शाहु राजा उदाहरण
राजकर्ता हवा कसा
रयत सुखात नांदते
तो जनमानसा ठसा
राजा असूनि सेवक
फाटा दिला विलासा
परित्यक्ता विधवांना
आधार लाभे असा
जोगतिणीमहिलांना
भाऊ पाठीशी जसा
व्हिक्टोरिया संस्थेत
कुष्ठरोग्यांस दिलासा
दीन दलीत बहुजना
मित्रवाटे हवाहवासा
हरीत होईलंआयुष्य
बळीराजाला भरोसा
शिक्षणाला अग्र क्रम
नव युगाचा कानोसा
बहुजन दीना भरोसा
तडा ना देई विश्वासा
सेवकरुपातला राजा
जन्मत नसतो सहसा
सलाम दृष्ट्या साहसा
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.