वारीत चोर ..

0

उत्साहे चाले वारी

आमचे भाग्य थोर

कळेना कसाकधी

वारीत घुसला चोर

उसवले सुरक्षाप्रश्न

पोलिसा  लागे घोर

काय न्यालं चोरून 

वारकरी रे बिनघोर

आयोजक करतात

व्यवस्था काटे कोर 

घुसतात  कावेखोर

तरीही   टवाळखोर

भक्ती भाव खजिना 

उघडा ठेवला समोर

विठू स्नेह  वर्षावात

नाचू लागले मनमोर

पांडुरंगासमान हिरा

रत्न नसे अन्य थोर

रखमा स्वता लक्ष्मी 

थक्कहोई खानचोर

नामस्मरणे सर्वं दंग

नभीचमके चंद्रकोर

हरि भजन  कैवल्य 

तृप्त भुकेला चकोर

घासातलेघास खाई

बदलला पार छछोर

सावळ्या भक्तफक्त

होऊनगेला घंटीचोर 

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996

 www.kavyakusum.com

2

पक्ष पर्यटना ..

नेत्यांनो करा  त्वरा

रे पक्ष पर्यटन करा

हवा  पालट  उपाय 

सन्मार्ग उत्तम खरा

आजइथे उद्या तिथे 

मनसोक्त सारे फिरा

रमले नाही  मन तर

परत माघारी  फिरा

वेग वेगळा झेंडा तो

हातात सन्माने धरा

सत्ता वाट पाहते हो

बाब जरा  धीर धरा

पाठ फिरवावी तशी

जसाजसा वाहेवारा

लाजलज्जाशरमेला

द्यायचा नसतो थारा

घ्यायला पाहुणचारा

जा वेगवेगळ्या घरा

बंद  करता दरवाजा

फटीतून हळूचं शिरा

झकास राही तब्येत

थारा नसो अहंकारा

लाटायची जर खुर्ची 

पडेलंकाम स्विकारा

वाढते गर्दीअलिकडे

पक्ष पर्यटना विहारा

दलबदलू नेत्यांसाठी 

मिळे सज्जड सहारा

– हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here