विश्वविक्रम नोंदवले
सातत्य यश प्रयासे
महाविजय नेहमीचं
लाभे अपूर्व सायासे
अथक सार्थक यत्न
तयारीकेली अभ्यासे
सव्यासाचीची नजर
उदिष्ट साधले ध्यासे
क्षितीजा स्पर्श करणे
प्राप्त नाही आदमासे
मगर सुसरीशी स्पर्धा
सविचार करती मासे
हिरो आपले जिंकता
रसिक होती वेडेपिसे
जिंकणारा मात्र शांत
विचलित नसे जरासे
जगत पाहते विस्पारे
यश प्राप्त केले कसे
इतिहास सुवर्ण पानी
उमटले अभिनव ठसे
रेकाॅर्ड तोडा कुणीही
खरे खेळाडू अधीरसे
मन मोठे आभाळाचे
खिळाडूवृत्ती ती दिसे
विश्वचषक ..
गाजला विश्वचषक
क्रिकेट महा संग्राम
उत्साही द्विदिवाळी
महोत्सवाचा हंगाम
जुने विक्रम मोडता
रचले नवीनआयाम
संकलन माहितीची
होई बुध्दीचेव्यायाम
सगळे क्रिकेटमयीचं
विसरले बाकी काम
एकच विषय चर्चेला
रे क्रिकेट सुबह शाम
डोळे नीत विस्पारले
पापण्यांना न विश्राम
डोक्यात सतत भुंगा
कमी पडला झेंडूबाम
जे खेळे जीव ओतून
त्यासर्वा सादरप्रणाम
हारजीत होत राहीलं
प्रयासा प्रशंसा इनाम
निमीत्त असे खेळाचे
एकत्र येई जन तमाम
आरंभ नव्यादोस्तीचा
हा नसे रे पूर्ण विराम
– हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६