शिव जन्मोत्सव कथा
दाटला गहिवर ऐकता
डोळ्यांत घळाळ धारा
अभिषेक चाले नुसता…
सार्थ आऊ सुपुत्र राजे
मराठी स्वप्नांची पुर्तता
मराठ्यांचे हो स्वराज्य
प्रत्यक्षात आली मुर्तता
शिव अभिषेक घालता
दुग्धास वाटेलं धन्यता
पाण्याचे जाहले तीर्थ
निसर्गही देतो मान्यता
जाणवेलं उर्जा स्त्रोत
रे पोवाडा मुखे म्हणता
इतिहास करे कुर्निसात
असा हा राजा जाणता
आकाशात एक अरूण
दुजा सिंहासनी बैसता
जागा नाही अंधाराला
मना फाकली स्वच्छता
सिंह सिंहासनी बसता
वाढली गादीची पात्रता
वाटाया लागेलं दुश्मनां
करायला हवी मित्रता
शिवबा शंभो आमचेचं
रे राजकारणी स्वार्थता
होता खरे शिवअनुयायी
होईल जन्माची सार्थता
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..