संतश्रेष्ठ तसा वेगळा
वेश जितका आगळा
गाडगे बाबा साक्षात
चालतीबोलती शाळा…
दीन दलीत गरीबांचा
सदैव तुम्हां कळवळा
चंदना सम झिझल्या
सुगंधाचा तव दर्वळा…
धर्म जात पंथ रूढी
तोडूनि टाकी शृंखला
अंध श्रद्धा बंध मुक्त
माणूसव्हावा मोकळा…
अंधश्रद्धा रिती रुढी
चोहीकडे पेटे झळा
जाती भेद मुळातूनि
बाबा बोले सारे जाळा…
किर्तनातून प्रबोधन
निर्झर वाहे खळाळा
मलीन करतो मानवा
स्पृश्यास्पृश्य धुराळा…
शतक उलटे हे तरी
अजूनि स्त्रवतो लळा
बीज रोपिले तेधवाचे
आता सुखावतो मळा….
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.