राज्याभिषेक ..
(संभाजीराजे )
राज्याभिषेक संपन्न
स्वराज्यां मिळे रूप
शिवरायांचे स्वप्नांस
लाभले मूर्त स्वरुप
पित्या समान सुपुत्र
कलागुणाने अनुरूप
उजळले रयत भाग्य
अशी वाती असे तूप
राजामिळे स्वराज्यां
वाचाळ बसले चूप
चपराक बसे तयास
मनचं ज्यांचे विद्रुप
मावळा होई बावळा
आनंदे नाचला खूप
आले दिवस सुखाचे
रयत किती सुखरुप
लहरेभगवा आकाशी
आला सकला हुरुप
माझे हक्काचे राज्य
वाटते तयाचे अप्रुप
स्वराज्यकरू सुराज्य
जनता जाहली तद्रुप
शिवरायांना धन्यवाद
पुन्हा राजा सुस्वरूप
४)
संभाजीराजे ..
शंभो राज्याभिषेकी
उत्साह सळाळेरक्ती
पाऊले चालून येती
कुठली नसता सक्ती
सर्व धर्मीय जमती
असे चमत्कारीनाती
स्वराज्य मित्रमावळे
एकचि उरली जाती
लहान थोर कुणाही
मना मनात छत्रपती
उत्सवतयारी करता
अभिमाने रूंदेछाती
मधेचंआली दिवाळी
ज्योतीउजळे ज्योती
किल्मिशे सर्वजळती
कुठून मिळते स्फुर्ती
भासते आशीष देती
शिवबा जीवंत मुर्ती
औरंगजेब हादरला
दिगंतरा जाय किर्ती
रायगडा जाया मिळे
कपाळा शोभवू माती
सद्वर्तन करुन सदैव
शभूराया जोडू नाती
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.