सभागृहात सहभाग
उठवा तिथे आवाज
कोणआपले सारथी
आशेने पाही समाज
सभागृहा बाहेर कसे
कुणी दाखवती माज
उध्दटविषारी बोलणे
वर्तनाची नाही लाज
विधीमंडळचीगरिमा
संविधानामुळे आज
किती तरी भले नेते
चढवला सुवर्णसाज
शरसंधान चाले नीत
सजून बसे तिरंदाज
कुणाचे बळी जाईल
कधी ना येई अंदाज
चर्चा मंथन नीत हवे
पूर्ण चाले कामकाज
तहकूब बहिष्कार हा
बनला नेहमी रिवाज
लोकशाही विरोधात
नर्तन करी आटबाज
कर्तव्य परायण नेता
कधी येईलं कार्पर्दाज
कठोर कारवाई हवी
कडूऔषध नाईलाज
रे विध्वंसकप्रवृत्तीचा
वेळी करावा इलाज
– हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६
2
खोटी केस ..
कधीकुणी करतात
खोटी केस दाखल
यक्षप्रश्नकोर्टासमोर
घ्यायची का दखल
मागचेडोके वेगळेचं
समोर भिन्न शकल
सत्य बाहेर येवू पाहे
कधीतरी होई उकल
विध्वंस करते तोवर
पुरती खोटी नक्कल
असे करायला हवे रे
उशीरा सुचे अक्कल
हातामध्ये उरले फक्त
खाजवतबस टक्कल
आवळू बसे कमरेला
अपराधीपणाबक्कल
नजरेत भरतो संशय
शंका आपल्या बद्दल
दुषीतकरतो चरित्रास
वातावरणातलाबदल
चूकनसताना चुकीची
का घडून जाते अद्द्ल
काय करालं व्याजाचे
रे हरवून बसता मुद्दल
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.