सिध्देश्वर ..
संक्रांतीला सोलापूर
अवचित कसाआलो
नाळ असे जोडलेली
सहज ओढला गेलो
मिरवणूककाठ्यांची
सुख अमृतात न्हालो
डोळे दिले पहायला
मी धन्य धन्य झालो
शुभ्र पांढ-या गर्दीमधे
मिसळून शुध्द झालो
जयघोष तो हर्र हर्रचा
भानही हरपूनि गेलो
सात नंदी ध्वज चाले
जय जय शिव बोलो
योगदंड तो वर होई
लग्नसोहळा निघालो
यण्णीमज्जन पूर्ण हो
अडुसष्ठ लिंगा भेटलो
गुरुभेट रे अलौकिक
मनी आनंदी दाटलो
तीळ गूळ देता घेता
वैर अहंम् ते विसरलो
लिंगाला आलींग देता
मी माझा नाही उरलो
भोगी ..
संक्रांतीच्या आधी
भोगी करी साजरी
आल्हाद दे मनाला
थंडी गोड बोचरी
उब देणारी बाजरी
गरमागरम भाकरी
तीळ लावस्नेहाचा
लोणी घ्या त्यावरी
पावटे वांगे गाजरी
हरबरेभाजी गोजरी
आयुष्य राहेनिरोगी
उष्णता देई शरीरी
हुर्डा पार्टी रंगायची
लज्जत रे लई भारी
तिळगुळ देता घेता
नात्यास येई उभारी
परंपरा मागचेशास्त्र
बोलते जेंव्हा वैखरी
हे असेच का असते
शास्त्रकळे खरोखरी
धर्म शास्त्र सांगडात
हरेक सण परोपरी
दु:खाआनंद झुळूक
साजरी करे घरोघरी
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.