सोंगटी ..

0

कधीकधी आंदोलक

यंत्रणेला  धरतो वेठी

माहिती असे  त्याला

जन शक्ती असे पाठी

कधी कधी अ कारण

खाल्ली पोलिस लाठी

ख-या खोट्या काहीही

केसेस लागल्या पाठी

लेकरांबाळा कल्याणे 

लढाया प्रेमाच्या पोटी

रे चुका आंदोलकांच्या 

मुखिया घालतो पोटी

छोटेमोठे ते सगळेनेते

घेऊलागती गाठीभेटी

उपोषणकर्त्या मुखांत

आश्वासने मिठी मिठी

संकट मोचक ते हुशार 

अनुभव दांडगा  पाठी

क्लिष्ट प्रश्न  हाताळणे

असे  निष्णात हातोटी 

प्रतिआंदोलन उभारले

सामना होता अटीतटी

दोन्ही आंदोलने भडके

आपसात हो  झटापटी

आंदोलक  हवे दूरदर्शी 

परिक्षा घेते ती कसोटी

निर्वाणीच्या वेळे साठी

जपून ठेवायची सोंगटी

– हेमंत मुसरीफ पुणे 

  9730306996..

 www.kavyakusum.com

2

पावित्र्य ..

आपल्या निष्ठेबद्दल

दाखला मिळे सर्वत्र

परक्यातंबूत दाखल

बदलून टाकले चित्र

अचंबित सकलजन

निर्णय घेतलेविचीत्र

सत्तालालसा अघोर

बिघडून जाय चरित्र

वसा देताना विचार 

केलानाही अणूमात्र 

कृतघ्नता  उदाहरण

मिळे न कुठे अन्यत्र

सत्ताअमृत न अक्षय

रिकामे होणारे  पात्र

जनता चाणाक्षभारी

स्वताचं करेलंअपात्र

पक्षांतरे धोक्यामध्ये

लोकशाही ही पवित्र

घेऊनि योग्य पवित्रा

राखायं हवे  पावित्र्य 

घेतलेत इतकेशत्रूत्व

कसे म्हणावे सन्मित्र

विसरुन गेले आठव

क्षण घालवले एकत्र

बाप मानता म्हणता 

असे नसतात सु पुत्र

वेदना दायक सर्वथा

रेखाटी विचीत्र  चित्र

– हेमंत मुसरीफ पुणे 

       ९७३०३०६९९६.

www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here