होलिकोत्सव …/होली हैं…

0

जमली पुढारी मंडळी

होलिकोत्सव निमीत्त 

वंदन होलिका देवीला

समस्त होई एकचित्त…

जमलेला  जन सागर

निवडणूकीकडे चित्त

सहज साधणार प्रचार

कुणीही होणार प्रवृत्त…

सत्तेची पुरणाची पोळी

अपेक्षा दिसे अनावृत्त

मनी उधळे रंग पंचमी

जिंकायचे  यंदा तख्त …

हुताशनीत  पापे दग्ध

घ्यायचे जर प्रायश्चित 

बदल व्हावा अंतर्मनी

रयतेशीजुडे सावचित्त…

झडतील ते कृमि जंतू

फाल्गुन मास अनुतप्त

सम्राट मनी सेवा वृत्ती

राज्य होणार रे सशक्त …..

होळीनसे इव्हेंट जाण

सेल्फी रिल्स करे मुक्त

बेधुंदीत बेहोश उन्मत्त 

भांगेची भांडी हो रिक्त…

जनता  देती भरभरून 

जे स्वार्थ वृत्तीत विरक्त

मतदार सर्वोच्च स्थानी 

खरा राजा अनभिषिक्त… 

होली हैं…

वैशाखशुद्ध पौर्णिमा 

होलिकोत्सव साजरा

जाळले अहंम् असूरा

दुर्गुण अशुद्ध  कचरा 

बोंबाबोंब  आग डोंब

अपशब्द करी निचरा

वाणी हो मधाळ शुध्द

विसर्जित क्रोधबोचरा

हात गुंफून  हातांमध्ये

होळीभोवती फेर धरा

पुरण पोळी  एकमेकां

गाणीगोड स्फुरे अधरा

अग्नी शांत  दुजे दिनी

धुलीवंदन प्रभाते करा

धुळवड सुखे  खेळावी

नमन  करून दिनकरा

चिखलचोळता शरिरा

उष्मा होणारं थंड बरा

उन्हाळा सुसह्य व्हावा

आयुर्वेदीयउपाय खरा

अवगुण मळी गळाली

निरोपद्यायचा विकारा

सणसंस्कृती जाणहवी

शुध्द श्रध्देने  स्विकारा

हास्य कवी संमेलनात

बौध्दिकहोळीसाकारा

व्यंगावरती बोटनसावे

नव पध्दती ये आकारा

हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996..

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here