होळी ../होळी नवी..

0

होळी ..

साजरी करता होळी

समजून  घ्यावा सण

नको  रे भाकडकथा

जाणून घे  शिकवण

जंगल अमोलसंपदा

कधी न फिटेल ऋण

उध्वस्त  करून  रान

कशाला साजरे सण

तोडण्याऐवजी करूं

नवरोपांची लागवण

वरूण कृपेने  संपेलं

पाण्यासाठी वणवण

प्रद्युप्त मनात  होळी

जाळूनटाकावे दुर्गुण

सुवर्णासमान विचार

उजळून येई सद्गुण

अभद्र  खराब  जे जे

द्यावे दुराचार  टाळून

सांकेतिक हवीहोळी

कुडा कचरा  जाळून

नव पिढी नव आदर्श

व्हावे प्रगत  संक्रमण

वारसा  पुढच्या  देता

बदलू जरा व्याकरण

 

 

नवी होळी ..

शिमग्याला शिवराळ

जोरदार बोंबा ठोका

मनातली रे जळजळ

गरळ  सरळ  ओका

स्वच्छ साफ  मन हो

देऊनका कुणाधोका

एकरूप होण्यासाठी

सण हा सुरेख मोका

पर्यावरणाचा विनाश

वृक्ष तोड वेळी रोखा

स्वता सांभाळ स्वता

समतोल भला  राखा

सणांच्या जाणा गुणा

संस्कृती कडून शिका

जीभ निर्मळ मोकळी

उगाचं कशाला  डंका

सुसंस्कृतअसे आपण 

मानवता विसरू नका

अश्लाघ्य भाषे ऐवजी

रे चांगले  राहणे  मुका

अन्न अग्नीत  कशाला

काटक्यासमिधा टाका

भरवावे  घास  तयाला

असेल कुणी जो भुका

हेमंत मुसरीफ पुणे .

  9730306996.

 www.kavyakusum.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here