अभिषेक ..
(संभाजीराजे )
शिव पुत्र शंभू राजे
छत्रपती सर्वां मान्य
अभिषेक करून त्या
रयतचं जाहली धन्य
मेघ भाराऊन जाती
आनंदे बरसे पर्जन्य
स्नेहाळ झाली धरती
उगवे भरभरुन धान्य
समाधान असामान्य
नाचती जन सामान्य
उत्साह येतो उत्सवा
सोहळा कुठे न अन्य
भगवा हाती धरूनि
रक्षणार्थ सज्ज सैन्य
उपाशी कुणी न निजे
पळवून लाविले दैन्य
मानवा सहित सुखी
पशू पक्षी प्राणी वन्य
राज्या पुन्हा नव्याने
दु:ख वेदना ऊरे शून्य
अखर्वात रे एखादा
प्रतिपालक ये भिन्न
शिव छत्रपती रे गेले
तरी मन उदास खिन्न
अभिषेक ..(संभाजीराजे )
राज्याभिषेक संपन्न
पावन होई रायगड
सुख शब्दात वर्णन
कार्य अति अवघड
मेघ डंबरी शोभिवंत
मेघ करती गड गड
जयकार हो राजेचा
सुप्त भावना उघड
सुखावले पशू पक्षी
किल्ले डोंगर दगड
घरा घरात दिवाळी
आनंद सर्वां रग्गड
दुश्मनसैन्य हबकले
शत्रू तंबूत भगदड
इकडे स्वप्न साकार
तिकडे होई पडझड
आऊंचे स्वप्न जपले
जनकल्याण आवड
सत्यात ये शिवराज्य
थांबवली ती परवड
रयतसेवार्थ जाणली
छत्र सिंहासन निवड
लोभ ना सत्तास्थाना
काळाची ही निकड
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996