अंतरपाट ..

0

नेते मंडळी विरोधी

चुकूनएकदुजां भेटे

का कसे कशासाठी 

उगा संशयधुके दाटे

त्वरे  चालवती डोके

चला बदलणारं फेटे

साध्या सुध्या प्रसंगा

रे आडवेतिडवे फाटे

कुणाची डोकी गरम

भाजू लागले फुफाटे

अंदाज बांधे मिडीया 

नक्की  तिघांचे फाटे

दगा बाजी बरी नाही 

विचार करी  उफराटे 

शंकाकुशंका भणका

उगाचं फुका ऊरफाटे

भाजून घ्या पुरीपोळी

आलेलाटणे पोळपाटे

सत्ताभुकेले आसुसले

घालू लागती हेलपाटे 

अख्या पब्लिकला ते

एका प्रसंगाने  झपाटे

बदणारं का सोयरिक 

धरुनबसले अंतरपाटे

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996

 www.kavyakusum.com

2

आरक्षणी ..

आरक्षणाची फिगर

आधी पन्नास टक्के 

अजूनहवे आरक्षण

मारी चौकार छक्के

आश्वासनांचीफिगर

पार करे शंभरटक्के

मनात येईलं ते बोले

जागोजाग रे लुख्खे

आंदोलक  नेहमीचं

शोधत राहती मोके

आम्हीचं  देणारं बरे

पुढारी  देतात धोके

कागदावर आरक्षण

कायदा  देतो धक्के

असेचं द्यायचेकाही 

कोर्टात टिके  पक्के

राजकीयनावावरती

हवेत मतांचे शिक्के

बसायचे  गादीवरती

देणारं गादी न् तक्के

काम पूर्णत्व नेत्यांचे

जशीइलेक्शन जिंके

आरक्षण करे भक्षण

सामान्या बसे दणके

– हेमंत मुसरीफ पुणे .

  9730306996…

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here