इलाज ../

0

ए आय तंत्रज्ञान हे

आहे मोठे शिकारी

विकत घेता त्याला

झाले सारे भिकारी 

स्वागत त्याचे  करी

जो आणतो बेकारी

विजयमाला हातात

कशी हार स्विकारी

तंत्रज्ञान  करी जादू

हवे ते सारे साकारी

पुसून  टाकी आम्हां

अस्तीत्व ते नाकारी

कौतुक  तया करता

भाषण ते अलंकारी

पडे तरी नाकडे वरी

आहोकसे अहंकारी

लुटलोगेलो संपूर्णतः 

वृत्तीमात्र परोपकारी 

विसरूनि मात्र गेलो

आपण दिली सुपारी

रोगा  केले आमंत्रित 

मग  कशास इन्कारी

इलाजआपणच शोधू

रामबाण रे प्रतिकारी

हेमंत मुसरीफ पुणे

  ९७३०३०६९९६.

 www.kavyakusum.com

दीदी चैतन्य ..

रविशशी स्तब्ध होई

कुठे  हरवले  चैतन्य

एकमेवाद्वितीयदीदी

तुज सम नाही अन्य

स्वर अमृत वर्षावात

पिढ्या  पिढ्या धन्य

कान ऐकता कुवार्ता

प्रथम अनुभवे  दैन्य

भरभरून दिले सर्वां

अंती केले का खिन्न

मरणास नसतो अंत

जीवन  जाहले शून्य

पुन्हा ना  होणे कधी

व्यक्तीत्व असामान्य

जगतात  प्रिय  दीदी

जगावरी औदासिन्य

सरस्वती  दे  वरदान

लकब आपली भिन्न

ऐ मेरे वतन के लोगो

उर्जावान अवघेसैन्य

आठवण ताजी जरी

हे हृदय छिन्नविछीन्न

का आलायं आजचा

दिवस काळाकभिन्न

हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996..

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here