ग्राहक ..

0

ग्राहक सेवा स्वरुप

बदले नवीन युगात

नाविन्यपूर्ण सगळे

ऑन लाईन जगात…

विक्रेता ग्राहक भेट

ना होणे  प्रत्यक्षात

तरी नाते  ते पवित्र

भाव बंधन  लक्षात

पसंत करावी  नीट…

वस्तू पाहून चित्रात

होम डिलिव्हरी  ती

मिळे काही क्षणात

भुगतान ऑनलाईन

करून टाक थाटात…

झिगझीग थांबलेली

अडकू नका नोटात

घोटाळेबाज उत्सुक

कार्यरत ते असतात

सहजपणे जाळ्यात

भोळेलोक फसतात…

सायबर  कायदे नवे

ते सदैव साथ देतात

जागृत रहा  ग्राहका

परिस तुझ्या हातात…

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

सेवा स्वरुप ..

बदले नवीन युगात

ग्राहक सेवा स्वरुप

ऑन लाईन जगात

अद्भुत असे प्रारूप

ग्राहक  विक्रेते नाते

अजूनि  वाटे अप्रुप

अतूट भावबंधन ते

नको द्यायला  फ्रुफ

बदलावे  व्यवसायां

नवीन  काळानुरूप

सोपा होई विनीमय

शिकण्यां येई हुरूप

सर्वत्र कार्यरत असे

गुन्हेगार अतिकुरुप

फसवावे नव प्रकारे

घोटाळे अनेक खूप

जाळ्यात  मृगजळी

सापडू शके गुपचूप

होता सज्ञानी साक्षर

चोरबसती चिडीचूप

सायबर कायदे उभे

सक्षम अन् अनुरूप

सतर्क रहावे आपण

जागरूक तसे तद्रूप

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here