चाळण ..

0

पहिल्याचं पावसात

रस्ता झाला चाळण

बिघडून गेले क्षणांत

सगळे दळण वळण

पादचारी हबकलेले

भितीने उडे  गाळण 

कसेचालायचे सांगा

कितीदाघ्यावे वळण

खाच खळगे मोठाले

रस्तोरस्ती ते घाळण

वाहतूक  खोंळाबली

वाहनांचेचाले छळण

दोषारोप कायमचेचं

चुके सरकारी धोरण

उपाय पडले बाजूला

वादविवाद अकारण

चालताना  पादचारी 

डोई घाले  शिरस्त्राण 

कर्मचारी  अधिकारी 

यंत्रणेवर किती त्राण

एकाचंपावसात असे

का रस्ते घेती लोळण

सामान्य माणूस मात्र

हो परिस्थिती खेळणं

– हेमंत मुसरीफ पुणे

  9730306996

 www.kavyakusum.com

2)

अभिनंदन ..

व्यक्त आनंद उत्साहे

जिंकले  नेते  आपले

फ्लेक्सबोर्ड होर्डिंग्ज् 

मोठालीझाडे कापले 

कशाला रे परवानगी

नोटीशीं  दावा टोपले

पोट भरून चिरीमिरी

सुरक्षा रक्षक  झोपले

रस्त्यांवर फलकराज

सिग्नलसुध्दा व्यापले

अपघातांना आमंत्रण

कायदा राज्य लोपले

सौंदर्यीकरण शहराचे

काळजीपूर्वक जपले

साहेबांच्या कौतुकात

क्षणार्धात कसे संपले

अशाजरांशा पावसाने 

रे झोड झोड झोडपले

गगनचुंबी बोर्ड फलक 

गरीबजनतेवर कोपले

जाऊ द्या  जीव हजार 

चालती आपले गफले

अभिवादन रे साहेबांचे

शहराला  नाही  झेपले

– हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996.

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here