पद यात्रा करताना
गरीब वस्तीत जातो
रेशीमबस्कर टाकून
जमिनीवरती बसतो…
वाळल्या भाकरीमधे
पिझ्झा लपून खातो
साहेब कसे हे साधे
चर्चा करितो जो तो…
कमाई तया घामाची
क्षण भरात उडवतो
नरडीवर पाय मारुन
भविष्यमस्त घडवतो…
शेंबडे पोरगे कडेवर
समक्ष उचलूनि घेतो
गरिबा कडून नेहमी
काही ना काही घेतो…
बिसलेरी शुध्द पाणी
तांब्यात घालून पितो
पळवूनलावेन गरिबी
आश्वासने फक्त देतो…
झोपवून टाकेसकला
अंगाई गीतनीत गातो
निवडणूक वेळी येतो
अज्ञात वासात जातो…
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
२)
मुगारा ..
(कोवळे रोप)
इथेच आहे म्हणत
कुणी देतात गुंगारा
पक्ष निष्ठ म्हणणारे
हळूचं करी पोबारा…
जीव तोडून फुगवा
फुटून जातो गुबारा
भ्रमंती करतो नेता
कधीतर येई दुबारा….
सतत नव्यापक्षाचा
लावत फिरे अंगारा
दल बदलू वाढलेले
भाव आला भंगारा…
आज हे पक्षा आले
जोरात पिटे नगारा
ना दुरुस्त बसेसची
जत्रा भरते आगारा
भरती करे आगंतुक
कंटाळलो रे उधारा…
पडझड चालू होता
कुणीच नसेआधारा
सूज आलीय शरीरा..
घातक अति फुगारा
पक्षमाती खिन्न होई
उपटून नेतात मुगारा…
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996