शिवबा राज्याभिषेक
आऊ स्वप्नांची पुर्ती
म-हाठी राज्य आले
दिल्लीपल्याड किर्ती…
मिळे हक्काचा राजा
मावळ्या अंगे स्फुर्ती
सिंहासनाधीश्वर राजे
तेजस्वी करारी मुर्ती
आकार दे स्वराज्या
म्हणून बैसले तख्ती
सत्ता ग्रहण छत्रपती
तरीही सत्ता विरक्ती
सम्राट रूपात सेवक
जन सेवेची आसक्ती
आपण हवे गादीवर
समस्त प्रजेची सक्ती
ते क्षत्रीय कुलावतंस
श्रीराजाशिवछत्रपती
राजपत्रावर कोरलेले
शब्द जगता व्यापती
शक संवत शुभारंभ
तुतारी दुदूंभी गर्जती
टंकसाळी शिवनाणी
खण खणाण वाजती
अष्टप्रधान मंत्रीमंडळ
प्रथमचं करे नियुक्ती
असे सांभाळा राज्य
आदर्श घातला तख्ती
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..