शिधावाटप ..
शिधावाटप स्वस्तात
कसे मानावे आभार
पाडल्यानंतर मिळता
परत देणार साभार
फोटो छापावे ठळक
कोण करतो किरदार
आयल्याचे जीवावरी
बायल्या कसा उदार
गरीबाले गोड पाडवा
मिळाला जरा आधार
अमूक तमूक देणार
जाहिराती रे शानदार
ऐकून लागल्या भुका
कहाण्या रे बहारदार
असा कसा रे दिसेना
दिव्याखालचा अंधार
योजना सर्व झकास
दिसते कशा कसदार
कारवाईमधे दिरंगाई
का करतात शिलेदार
झारीमध्ये शुक्राचार्य
त्यांच्या वरती मदार
बदनाम ते राज्यकर्ते
तिसरे असती गद्दार
2)
कोर्ट निकाल ..
राखून ठेवी निकाल
कधी तरी न्यायासन
होवून जाई अवस्था
ती पुरती मरणासन्न
वरुनि हसतात जरी
आतून सगळे खिन्न
दोन्ही पक्षांचीस्थिती
मुळीचं नसते भिन्न
कायकाय वाढले पुढे
ते गोड लागेना अन्न
तिढा सुटण्याचे कुठे
दिसेना कसले चिन्ह
कोर्ट निवाडा अंतीम
असणारं सर्वां मान्य
लांबत चालली सुगी
संपत चालले धान्य
शेवटचा उपाय हाचं
रस्ता ना दुसरा अन्य
सगळेडोळे कोर्टाकडे
कधी बरसेल पर्जन्य
पुढारी पाहे कोर्टाकडे
त्यातचं होई शत धन्य
आपल्याकामात व्यग्र
जनता सर्वं सामान्य
– हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.