संयुक्त महाराष्ट्र चळवळीला चेतविणारे – शाहिर अण्णाभाऊ

0

 ण्णाभाऊ साठे  म्हणून ओळखले जाणारे एक मराठी  समाजसुधारकलोककवी  आणि लेखक होते. साठे हे मांग (हिंदु) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर गव्हाणकर यांनी केले. मुंबईमराठवाडाविदर्भकोकणपश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.

      भाऊ साठे पहिल्यांदा कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले. 1944 मध्ये दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी “लालबावटा” कला पथक स्थापन केले. लावण्या, पोवाडे व पथनाटये या माध्यामातून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व गोवा मुक्ती आंदोलनात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. याद्वारे त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले होते. ते 1940 च्या दशकामध्ये कार्यरत राहिले आणि तेविया अब्राम्स यांच्यानुसार, भारतातील साम्यवादाच्या आधी स्वातंत्र्याच्या नंतरची  “1950 च्या दशकातील सर्वात रोमांचक नाटकीय घटना” होती. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है !” इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते, जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, ज्याने भाषिक विभागातून वेगळे मराठीभाषी राज्य (बॉम्बे राज्य) निर्माण करण्याची मागणी केली होती.

      भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला.  1958 मध्ये, बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की, “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे” यातून त्यांनी जागतिक संरचनांमध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले. या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरित, साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते. त्यांनी म्हटले आहे की, “दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही.”

      “अण्णाभाऊंच्या गोष्टींत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही; पण त्यांचा प्रकृतीधर्म आहे गंभीर लेखकाचा. ज्यांन फार भोगलं आहे, सात पडद्यांतून नव्हे, तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे. अशा पोटतिडकीने लिहणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिट्यपूर्ण असतात. म्हणून तत्कालीन सर्व बड्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात आग ओकणाऱ्या सर्व तऱ्हेच्या गोष्टींच्या अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्यांच्या मनात एकप्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचे पूजक आहेत.”

      प्र. के. अत्रे, कॉ. श्री. अ. डांगे, एसेम, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्या संपर्कात आल्याने अण्णाभाऊंचे लेखन अधिक खुलत गेले. महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रेरणेने त्यांना साहित्यात अधिष्ठान लाभले. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळविले असले तरी, त्यांचा मूळपिंड शाहिराचा आणि कविचा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “मार्क्सवाद भाकरीचा प्रश्न सोडवील पण माणुस म्हणुन जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतोच. मला भाकरी पेक्षा इज्जत आणि स्वाभिमान प्यारा आहे” या विचाराने अण्णाभाऊ भारावून गेले. हा स्वाभिमान त्यांनी निर्माण केलेल्या पात्रातून आपले अस्तित्व दाखवू लागला. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात दोन गोष्टींचा तिटकारा केला. एक म्हणजे श्रीमंतांकडुन होणारे गरीबांचे शोषण नि-अस्पृश्य बांधवांची होणारी धार्मिक, सामाजिक पिळवणुक या बाबींवर आपल्या लेखणीने सतत प्रहार केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आणि गेल्या 50 वर्षात झालेल्या साहित्य, संस्कृतीच्या जडण-घडणीत मराठी साहित्य आणि साहित्यीकांचे योगदान त्यात प्रामुख्याने अण्णाभाऊंचे लक्षणीय ठरले.

  भाऊ साठेंच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथा शैलींच्या वापराने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’ मध्ये, साठेंनी आपल्या समुदायाला पूर्ण भुखमरीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढिवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकिराला चित्रित केले. नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकारी द्वारे अटक आणि छळ दिला जातो, आणि अखेरीस फकिराला फाशी देऊन ठार मारले जाते.

      मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला. त्यांनी त्यांच्या “मुंबईची लावणी” आणि “मुंबईचा गिरणी कामगार” या दोन गाण्यांतून मुंबईला “दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण” असे म्हटले आहे. त्यांच्या कार्याचा मोजदाद करताच येत नाही, इतक्या भव्य प्रमाणात त्यांची कारकीर्द नजरेत भरते, तिला दुर्लक्षित करुन चालणार नाही.      भाऊ साठे हे दलितांचे आणि विशेषतः मांग जातीचे प्रतीक बनले आहेत. शासन मान्यता असलेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना 1985 मध्ये मांग समाजातील लोकांसाठी करण्यात आली. तसेच मानव हक्क अभियानाच्या (एक मांग-आंबेडकरी संस्था) मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अत्यंत महत्वाचे म्हणजे,  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष– शिवसेना युती सारख्या राजकीय पक्षांनी मांगांकडून निवडणुकांमध्ये समर्थन मिळविण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचा वापर केला आहे, करीत असतात. 

 भाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (1959) समाविष्ट आहे, जिला इ.स. 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. साठेंच्या लघु कथांचा संग्रह 15 आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, 12 पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील 10 गाणी लिहिली.

      1 ऑगस्ट 2001 रोजी भारतीय पोस्टाने 4 रु. च्या टपाल तिकिटावर साठेंचे चित्र ठेवले होते. साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 1 ऑगस्ट 2019 रोजी हे टपाल तिकीट वितरित करण्यात आले. मुंबईच्या कुर्लामधील एका उड्डाणपुलासह अनेक इमारतींना त्यांचे नांव देण्यात आले आहे. सांगली जिल्हयातील वाटेगांव या जन्मगावी अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक तसेच पुणे येथे देखील स्मारक तयार करण्याचा निर्धार शासनाने जाहीर केला आहे. 19 जुलै 1997 पासुन शासनाने राज्यातील मातंग समाजातील कलावंत साहित्यिक व समाजसेवक यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्याची योजना कार्यांन्वित केली, यालाच27 वर्षे पूर्ण होत आहे. शासनाने पुरस्कृत केलेला हा उपक्रम स्तृत्य आहे. ज्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कर्तृत्वाची नोंद घेवून आणि अख्या महाराष्ट्राला शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला चेतविण्यााऱ्या शाहिरास त्यांच्या पावन स्मृतीस मानाचा मुजरा !

प्रविण बागडे

नागपूर,

भ्रमणध्वनी :  9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here