सुक्ष्मवृत्तीचे अक्षर शोधण्याची कला यांच्याच ठायी !

0

 दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘जागतिक अंध दिन’ किंवा ‘पांढरी काठी सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो, हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश अंधत्व आणि दृष्टीदोषाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. तुम्ही रस्ता ओलांडताना, चालताना संपूर्ण पांढर्‍या रंगाची किंवा वरून दोन तृतींयांश पांढरा आणि खाली एक तृतीयांश लाल रंग असलेली काठी घेऊन चालणारे अनेक लोक पाहिले असतील. हे सर्व लोक देसी डोळे परी निर्मिसी त्यापुढे अंधार अशी निसर्गाची अजब निर्मिती असलेले अर्थात अंध असतात. या दिवशी नॅब (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) या संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ऑक्टोबरचा दुसरा गुरुवार हा जागतिक दृष्टी दिन आहे, आपले डोळे आणि दृष्टी सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याची, दृष्टीदोष आणि अंधत्वाबद्दल जागरुकता वाढवण्याची आणि नेत्र आणि दृष्टी काळजीला प्रोत्साहन देण्याची संधी.

 २००० पासून जागतिक दृष्टी दिन साजरा केला जात आहे आणि आता जागतिक आरोग्य संघटनेच्या बरोबरीने अंधत्व प्रतिबंधक आंतरराष्ट्रीय एजन्सीद्वारे समन्वयित केले जात आहे. हे सुरुवातीला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या साइटफर्स्ट मोहिमेचा भाग म्हणून पाळण्यात आले. या दिवशी नेत्र तपासणी किंवा तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्याचे वचन द्या आणि इतरांना तसे करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मीडियावर शेअर करा. या जागतिक दृष्टी दिनाचे आंतरराष्ट्रीय अंधत्व प्रतिबंधक संस्था (आयएपीबी) चे उद्दिष्ट १० दशलक्ष डोळ्यांच्या चाचण्यांपर्यंत पोहोचणे हे आहे आणि नेत्र निगा सेवांसाठी जागरुकता निर्माण करण्याचे वचन दिले आहे. या वर्षी २०२४ मधील जागतिक आरोग्य दिनाची थीम ‘माय हेल्थ, माय राइट’ अशी आहे आणि आम्ही अधिक सहमत होऊ शकलो नाही.

  केंद्र व राज्य सरकारनेही नेत्रचिकित्सा व कॅटरॅक्टसवर अद्ययावत उपचारपद्धती या बाबींवर भरीव आर्थिक तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. शासनयंत्रणेने अंधत्व मिटविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास अंधत्व निर्मूलन अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. अंधांसाठी प्रत्येकाने सहानुभूतीपेक्षा स्वानुभूतीची भूमिका अवलंबिली पाहिजे. स्वत:चे डोळे पट्टीने बांधून काही वेळ जगायची अनुभूती घ्यावी, म्हणजे त्यातील गांभीर्य कळून येईल. अंध, अपंग, मतिमंद वा मूकबधिरांना गुणदोषांसह स्वीकारून त्यांना आपलसं करणं यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. अंधांना सामाजिक जाणिवेतून रस्ता ओलांडताना मदत करणे, रेल्वे-बसमध्ये बसण्यास आपली जागा देणे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणे, जीवनाशी निगडीत विभिन्न विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांचे मनोबल वाढविणे या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात वावरताना करायला पाहिजेत. इतकेच नव्हे तर, एक पाऊल पुढे टाकून एखाद्या अंध व्यक्तीशी डोळस व्यक्तीचा विवाह करून देऊन त्याचे अंधकारमय जीवन प्रकाशमय करणं हे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनात करू शकतो. आजच्या घडीला अंधत्वाची समस्या मिटविण्यासाठी नेत्रदान ही मोहीम लोक चळवळ होणे गरजेचे आहे. 

        सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मानव म्हणून जीवंतपणी अनेकप्रकारे पुण्यकर्म करीत असतो, हे कौतुकास्पद आहे. तथापि, मृत्यूनंतरही नेत्रदान करून आपण आणखी एका पुण्यकर्मात भर टाकू शकतो. म्हणून ही संधी दवडू नका, यासाठी नेत्रदानाकरिता आधीच इच्छापत्र भरून द्या, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर आपली नेत्रं दुसऱ्या अंधव्यक्तीला दान देऊन त्याला नवीन दृष्टी देता येईल. चला तर, नेत्रदान करून अंधत्वाची समस्या मिटविण्यास वचनबद्ध होऊ या. नियतीने डोळ्यातल्या प्रकाश ज्योती हिरावून घेत ज्या अंध बांधवांचे आयुष्य अंधकारमय करून टाकले आहे, त्यांच्या जीवनात यंदाची दिवाळी आशेचा किरण आणेल अशी आपण सर्व प्रार्थना करू या!

  केंद्र व राज्य सरकारनेही नेत्रचिकित्सा व कॅटरॅक्टसवर अद्ययावत उपचारपद्धती या बाबींवर भरीव आर्थिक तरतूद करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत. शासनयंत्रणेने अंधत्व मिटविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास अंधत्व निर्मूलन अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. अंधांसाठी प्रत्येकाने सहानुभूतीपेक्षा स्वानुभूतीची भूमिका अवलंबिली पाहिजे. स्वत:चे डोळे पट्टीने बांधून काही वेळ जगायची अनुभूती घ्यावी, म्हणजे त्यातील गांभीर्य कळून येईल. अंध, अपंग, मतिमंद वा मूकबधिरांना गुणदोषांसह स्वीकारून त्यांना आपलसं करणं यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. अंधांना सामाजिक जाणिवेतून रस्ता ओलांडताना मदत करणे, रेल्वे-बसमध्ये बसण्यास आपली जागा देणे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधणे, जीवनाशी निगडीत विभिन्न विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारणे, त्यांचे मनोबल वाढविणे या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात वावरताना करायला पाहिजेत. इतकेच नव्हे तर, एक पाऊल पुढे टाकून एखाद्या अंध व्यक्तीशी डोळस व्यक्तीचा विवाह करून देऊन त्याचे अंधकारमय जीवन प्रकाशमय करणं हे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनात करू शकतो. आजच्या घडीला अंधत्वाची समस्या मिटविण्यासाठी नेत्रदान ही मोहीम लोक चळवळ होणे गरजेचे आहे. 

        सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण मानव म्हणून जीवंतपणी अनेकप्रकारे पुण्यकर्म करीत असतो, हे कौतुकास्पद आहे. तथापि, मृत्यूनंतरही नेत्रदान करून आपण आणखी एका पुण्यकर्मात भर टाकू शकतो. म्हणून ही संधी दवडू नका, यासाठी नेत्रदानाकरिता आधीच इच्छापत्र भरून द्या, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर आपली नेत्रं दुसऱ्या अंधव्यक्तीला दान देऊन त्याला नवीन दृष्टी देता येईल. चला तर, नेत्रदान करून अंधत्वाची समस्या मिटविण्यास वचनबद्ध होऊ या. नियतीने डोळ्यातल्या प्रकाश ज्योती हिरावून घेत ज्या अंध बांधवांचे आयुष्य अंधकारमय करून टाकले आहे, त्यांच्या जीवनात यंदाची दिवाळी आशेचा किरण आणेल अशी आपण सर्व प्रार्थना करूया

प्रवीण बागडे

नागपूर

भ्रमणध्वनी : ९९२३६२०९१९ ई मेल: pravinbagde@gmail.com ————————————————

!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here