आर. के. एफ. विद्यालय जेएनपीटी ओपन स्टेजवर डि.डि.सी. प्रेझेंट वार्षिक डान्स शो चे आयोजन.

0

उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )

आर. के. एफ. विद्यालय जेएनपीटी ओपन स्टेजवर डि.डि.सी. प्रेझेंट वार्षिक डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. डि.डि.सी. प्रशिक्षक दिनु पाटील,दिनेश पाटील ( जेएनपीटीचे ट्रस्टी तथा माजी जिल्हाप्रमुख शिवसेना , कामगार नेते)यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन झाले. याप्रसंगी दीप प्रज्वलन आणि श्रीफळ काशिबाई ठाकुर (सरपंच जसखार),प्रतीक्षा ठाकुर माजी उप सरपंच, शिवसेना उप तालुका प्रमुख  प्रदीप ठाकुर(माजी सरपंच चिरले तथा थर्ड डान ब्लॅक बेल्ट), अजिंक्य पॉवर जिमचे अजिंक्य गोपाळ पाटील,स्टॉम पॉवर जिमचे सिद्धेश शिंदे, पागोटेचे युवा सरपंच कुणाल पाटील, उद्योगपती सुदीप दादा पाटील, संदीप घरत,आर्यन पाटील यांच्या उपस्थित पार पडला. 

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जेएनपीटीचे ट्रस्टी  दिनेश पाटील  यांनी शुभेच्छा देताना डि.डि सी. चे दिनेश पाटील यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले. यावेळी उत्तम नृत्य, आगरी कोळी गीते व सामूहिक डान्स चे नेत्रदीपक सादरीकरण झाले. 

हजारो प्रेक्षकांच्या  उपस्थित प्रशिक्षक दिनु पाटील यांच्या 80 विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले.पनवेलकर ग्रुप,डान्स, सिजन ५ चे कलाकार, मी होणार सुपर स्टार (डान्स दिवाणे ३चे कलाकार),नवरा पाहिजे गोरा गोरा फेम पायल पाटील, राया फेम आदित्य घरत, सिने अभिनेता अमन  वास्कर, युट्यूब स्टार प्रीत बांद्रे, शिवम कुंभार अँडि कुंभार आणि हितेश कडू यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सदस्य राकेश तांडेल यांनी सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन आणि निवेदन आतिष पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here