हडपसर प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लोकनेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून सप्ताह साजरा करण्यात आला. शरदचंद्रजी पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कॉलेजमध्ये वृक्षारोपण समारंभ, काव्यलेखन स्पर्धा, रक्तदान शिबिर, निबंधलेखन स्पर्धा आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
आज कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, हेल्थ क्लब आणि नोबल हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे उपस्थित होते. “रक्तदानाच्या माध्यमातून आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. रक्तदान हे श्रेष्ठदान आह़े. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून देशसेवेचे महान कार्य करावे” असे मत उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नोबल हॉस्पिटल ब्लड बँकेच्या डॉ. संगीता पडी , प्रवीण जाधव, मनोज पाटील, विकास गोमसाळे, स्वाती गवसने, मंगल जाधव व प्रज्वल पिरीकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा.राधाकिसन मुठे आणि हेल्थ क्लबचे चेअरमन डॉ.विलास कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.ऋषिकेश खोडदे, डॉ.निशा गोसावी, प्रा.डॉ.दिनकर मुरकुटे व फिजिकल डायरेक्टर प्रा.दत्ता वासावे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संजय जड़े, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, डॉ.शहाजी करांडे, प्रा.किसन पठाडे, प्रा.डॉ.रंजना जाधव , डॉ.नम्रता कदम, प्रा. फुलचंद कांबळे, प्रा.स्वप्निल ढोरे, महाविद्यालयातील विभागप्रमुख व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या प्रसंगी २५० विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी केली. एकूण ५५ बॅगेचे रक्त संकलन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विलास कांबळे यांनी केले. सुत्रसंचलन डॅा.शितल कोरडे यांनी तर आभार डॉ.अतुल चौरे यांनी मानले.