कोपरगाव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव यांच्या वतीने कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे उर्फ माई यांच्या स्मृती प्रित्यर्थ, भव्य ‘आंतर- महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे २३वे वर्ष असूनमंगळवार,दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.श्री.अॅड.संदीपजी वर्पे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. ही स्पर्धा या वर्षी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी दिली.
सदर स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस रकमेची पारितोषिके ठेवण्यात आलेली असून, प्रथम क्रमांकासाठी रु. ९००१,स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, द्वितीय क्रमांकासाठी रु.७००१, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र; तृतीय क्रमांकासाठी रु.५००१,स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र याशिवाय तीन स्पर्धकांसाठीउत्तेजनार्थ रुपये १००१ अशा स्वरूपात बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धकांना आपले विचार मांडण्यासाठी १) एक समर्पणशील त्याग मूर्ती: सुशीलाबाई (माई) शंकराव काळे २)अवकाश संशोधन आणि भारत ३)समाज माध्यमांच्या विळख्यात तरुणाई४) जागर महिला शक्तीचा ५)वर्तमानातील राजकारण व आजचा युवक ६)विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची उपयोगिता ७)कृत्रिम बुद्धिमत्ता – मानवी प्रज्ञेला आव्हान८)बहुआयामी व्यक्तिमत्व कर्मवीर शंकरराव काळे. असे विविध विषय देण्यात आलेले आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी ०१ जानेवारी २०२३ पर्यंत आपली नाव नोंदणी करावयाची असून स्पर्धेसाठीचा आपला व्हिडिओ ९५५२९८१०६५ या व्हाट्सअप व टेलिग्राम नंबर वर पाठवावयाचा आहे. स्पर्धकांनी अधिकच्या माहितीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब शेंडगे यांच्याशी संपर्क साधावा आणि अधिकाधिक संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे.स्पर्धेसाठी आपले ०७ मिनिटांचे व्हिडिओ०२ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब शेंडगे,स्पर्धा संयोजन समिती आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले आहे.