दिनविशेष/ परीपाठ/आजचे पंचाग

0


दिनांक :~ 09 मार्च 2023 ❂
    🎴 वार ~ गुरूवार
🎴

      *🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

फाल्गुन. 09 मार्च
तिथी : कृ. द्वितीया (गुरू)
नक्षत्र : हस्त,
योग :- गंड
करण : तैतील
सूर्योदय : 06:53, सूर्यास्त : 06:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡सावलीचा खरा अर्थ उन्हातून गेल्याशिवाय समजत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्हणी व अर्थ

📌खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.

🔍अर्थ:-
आपली कुवत नसताना व्यवहार करणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🚩संत तुकाराम महाराज बीज🚩

🌞या वर्षातील🌞 68 वा दिवस आहे.

*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

👉१९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला ‘सरस्वती पुरस्कार’ उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
👉१९५९ : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
👉१९४५: अमेरिकेच्या बी-२९ विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यात १ लाखाहुन अधिक लोक मृत्युमुखी पडले.
👉१९१६: आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली.

*🌹जन्मदिवस / जयंती🌹*

👉१९३० : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक
👉१९५१ : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक
👉१९५६ : शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ
👉१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.
👉: भारतीय चित्रपट अभिनेते सुशांत सिंग यांचा जन्म.
👉१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

  *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

👉२००० : उषा मराठे – खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल
👉१९९४: देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ३० मार्च १९०८)
👉१९७१ : के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक
👉१६५० : संत तुकाराम यांचा वैकुंठवास
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेली नदी कोणती आहे?
🥇गोदावरी

👉महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध असलेली बाजारपेठ कोठे आहे?
🥇अमरावती

👉कोणत्या मराठी संतास आद्य समाजसुधारक असे म्हणून ओळखतात?
🥇संत एकनाथ

👉महाराष्ट्रातील कोणता जिल्हा देशातील गूळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे?
🥇कोल्हापुर

👉सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे या आधीचे नाव काय?
🥇पुणे विद्यापीठ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕸 बोधकथा 🕸

🐱स्वार्थी मांजर

एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, ‘ते मांजर दिसले तर मारून टाकीन’ असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणार्‍या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, ‘हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे.’ इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.

🧠तात्पर्य : –
स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

श्री. देशमुख. एस. बी,
🌻सचिव🌻नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
📱7972808064📱
🙏🌹 सेक्रेटरी -बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर 🌹🙏मुख्याध्यापक पाताळेश्वर विद्यालय पाडळी🌹 सचिव , प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे .
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here