*परीपाठ/पंचाग/दिनविशेष* 

0
*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता .सिन्नर* *7972808064*

 

*दिनांक :~ 20 डिसेंबर 2022* *वार ~ सोमवार* 

*आजचे पंचाग* 

*मार्गशीर्ष. 20 डिसेंबर*

*तिथी : कृ. द्वादशी (सोम)*   

*नक्षत्र : स्वाती,*

*योग :- सुकर्मा* * करण : कौलव*

*सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 05:51,*

*सुविचार* 

*कोणतेही अडथळे नसलेली*

*साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही..!*

*म्हणी व अर्थ* 

*आलीया भोगासी असावे सादर.*

*अर्थ :- आपल्या कर्मात जे काही लिहले आहे त्यानुसार भागावे लागते, त्याबद्दल कुरकुर करू नये.*

*दिनविशेष*    

*या वर्षातील 354 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१९२४: अडोल्फ हिटलर यांची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.*

*१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.*

*१९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.*

*१९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान.*

*२०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.*

*जन्मदिवस / जयंती*

*१८६८: फायरस्टोन टायर आणि रबर कंपनीचे संस्थापक हार्वे फायरस्टोन यांचा जन्म. (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)*

*१८९०: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६७)*

*१९४०: पद्मश्री भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म.*

*१९४२: पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश राणा भगवानदास यांचा जन्म.*

*१९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१७३१: बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचे निधन. (जन्म: ४ मे १६४९)*

*१९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)*

*१९३३: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे निधन. (जन्म: २२ मे १८७१)*

*१९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)*

*१९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)*

*१९९३: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट यांचे निधन.*

*१९९६: बलुतं कार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)*

*१९९८: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)*

*२०१०: लेखक सुभाष भेंडे यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १९३६)*

*सामान्य ज्ञान* 

*वर्षातील सर्वात लहान दिवस कोणत्या तारखेला असतो?* 

*22 डिसेंबर*

*संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान  कोणत्या ठिकाणी आहे?* 

*देहू*

*365 दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात?* 

*सौरवर्ष* 

*आपल्या घरासमोर लावण्यात येणाऱ्या औषधी वनस्पतीचे नाव काय?* 

*तुळशी*

*आवाजाची तीव्रता कशाच्या सहाय्याने मोजतात?* 

*डेसिबल*

* बोधकथा *

*बळी तो कान पिळी* 

*एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्‍या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले.*

*तात्पर्य:-*

*बळी तो कान पिळी.*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता .सिन्नर* 

 *7972808064* 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here