परीपाठ/पंचाग/दिनविशेष

0
सौ . सविता देशमुख, उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर_ *7972808064*


दिनांक :~ 23 जाने 2023 ❂🎴 वार ~ सोमवार 🎴

      *🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

माघ. 23 जानेवारी
तिथी : शु. द्वितीया (सोम)
नक्षत्र : धनिष्टा,
योग :- व्यतिपात
करण : बालव
सूर्योदय : 06:54, सूर्यास्त : 05:54,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो…
म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा….
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्हणी व अर्थ

📌करू गेले काय अन् उलटे झाले काय.

🔍अर्थ :- करायचे एक आणि झाले भलतेच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🌞या वर्षातील🌞 23 वा दिवस आहे.

🇮🇳राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.

*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

👉१५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर
👉१७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
👉१८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
👉१९३२: ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.
👉१९६६: आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
👉१९७७: जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.
👉२००२: भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले

*🌹जन्मदिवस / जयंती🌹*

👉१८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)
👉१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
👉१८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)
👉१९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२)
👉१९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)
👉१९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)

  *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

👉१६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन (जन्म: १८ मार्च १५९४)
👉१९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (जन्म: २६ मे १८८५)
👉१९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? ????) 👉२०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ आक्टोबर १९२७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉शांततेचे प्रतिक असलेला रंग कोणता आहे?
🥇सफेद रंग

👉थर्ड अंपायर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
🥇क्रिकेट

👉हैद्राबाद हे शहर कोणत्या राज्यातील आहे?
🥇आंध्र प्रदेश

👉देव या शब्दाच्या विरुधार्थी शब्द कोणता?
*दानव

महात्मा गांधी यांची हत्या कोणत्या व्यक्तीने केली?
*नथुराम विनायक गोडसे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
बोधकथा

🔸वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून ठरवायची नसते🔸

एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, ‘अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.’ त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, ‘अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या वमाझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.

*तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*देशमुख. एस. बी, मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर
▪️सचिव
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ 7972808064:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,

▪️सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.
सचिव : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ 7972808064

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here